>Kevha Tari Pahate

Posted: May 15, 2011 in TV SHOW

>

केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली

सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे ?
उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली !

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे …..
आकाश तारकांचे, उचलून रात्र गेली !

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली !

आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी …..
( हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली )

अजुनी सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा …..
गजरा कसा फुलांचा विसरुन रात्र गेली ?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s