>Damalelya babachi hi kahani

Posted: May 20, 2011 in Album Song, TV SHOW

>

कोमेजून निजलेली एक परीराणी उतरलेले तोंड डोळा सुटलेले पाणी,
रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही,
ज़ोपेतच घेतो तुला आज मी कुशीत निजतेच तरी पण येशील कुशीत,
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,

आट-पाट नगरात गर्दी होत भारी घामाघुम राजा करी लोकलची वारी,
रोज सकाळीच राजा निघताना बोले गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले,
जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेतच घरी,
स्वप्नातल्या गावा मधे मारू मग फेरी खर्या खुर्‍या परि साठी गोष्टीतली परि ,
बांधींन मी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,

ओफीसात उशिरा असतो मी बसून भंडावले डोके गेले कामात बुडून ,
तास तास जातो खाल माने ने निघून एक एक दिवा जातो हळूच विजून,
अशावेळी काय सांगू काय काय वाटे आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे.
वाटते की उठुनिया तुज़या पास यावे तुज़या साठी पुन्हा लहान व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुज्याशी चिमुकले खेळ काही मांडावे तुज्याशी ———

उधळत खिधळत बोलशिल काही बघताना भान मला उरणार नाही ,
हासूनिया उगाचच ओरडेल काही दुरुनच आपल्याला बघणारी आई ,
तरी सुद्धा दोघे जन दंगा मांडू असा क्षणा क्षणा वर ठेवू खोडकर ठसा ,
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,

दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभईं मऊ-मऊ दूध भात भरवेल आई ,
गोष्ट ऐकायला मग यशील ना अशी सावरी च्या उशिहून मऊ माझी कुशी.

कुशी माज़ी सांगत आहे एक बाळा काही सदोदित जरी का मी तुझा पास नाही ,
जेउ माखु नाहू खाउ घालतो ना तुला आई परी वेणी – फनी करतो ना तुला ,
तुझ्या साठी आई परी बाबा पण खुला तो ही कधी गुप चूप रडतो रे बाळा
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,

बोळ्क्या मधे लुक – लुकलेला तुझा पहीला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेंव्हा मऊ भात
आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतलास जेंव्हा घराचा ताबा
लूटू लूटू उभ रहात टाकलस पाऊल पहिल दूर च् पाहत राहिलो फक्त जवळच पाहायच राहून गेल, राहील

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरुन
असा कसा बाबा देव लेकराला देतो लवकर जातो आणि उशिराणी येतो,
बालपण गेले तुजे गुज निसटून उरे काही तुझा माझा ओन्झळी मधून ,
जरी येते ओठी तूज्या माज्यासाठी हसे नजरेत तुज्या काही अनोळखी दिसे ,
तुज्या जगातून बाबा हरवेल का ग ? मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता जाता उंबरठ्या मधे बाबसाठी येईल का पाणी डोळ्यामधे ?
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला दमलेल्या बाबची कहानी तुला.
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला,

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s