>मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरा

Posted: May 28, 2011 in OLD SONG

>

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे !

मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे !

लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की

राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे !

गर्द राईतून यावा भारलेला गार वारा

तू मुक्या ओठात माझ्या दंशताजे ऊन्ह प्यावे !

चांदण्याचा श्वास जाईच्या फुलांमाजी विरावा …

आपुल्या डोळ्यात साऱ्या तारकांनी विर्घळावे !

तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी

रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे !

रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी …

मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे !

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s